1513233317
Inspiration Katta : Marathi Podcast - इन्स्पिरेशन कट्टा - मराठी पॉडकास

Advertise on podcast: Inspiration Katta : Marathi Podcast - इन्स्पिरेशन कट्टा - मराठी पॉडकास

This podcast has
63 episodes
Language
English
Explicit
No
Date created
2020/05/13
Latest episode
2023/11/24
Average duration
48 min.
Release period
28 days

Description

A Marathi podcast for personal development journey. आयुष्यात काहीतरी वेगळं करायचं आहे ! जे काम करतो आहे त्यात मजा येत नाही आहे ! जिथे काम करतो आहे त्यात बदल हवासा वाटतो आहे ! ज्या लोकांबरोबर राहतो आहे त्यात काहीतरी चुकीचं वाटत आहे ! सगळं सुरळीत आहे पण कसली तरी कमी आहे.. काहीतरी, मीठ, तिखट, लिंबू काही तरी कमी आहे. आयुष्याच्या ध्येयाचा शोध चालू आहे, पण तो सापडत नाही आहे. तुम्ही आयुष्याच्या अश्या टप्प्यावर असाल तर हा पॉडकास्ट तुमच्यासाठी आहे.. नक्की ऐका

Unlock Inspiration Katta : Marathi Podcast - इन्स्पिरेशन कट्टा - मराठी पॉडकास podcast Email contact info,
Listeners & Audience details

Email contact information

Direct podcast contact details

Listeners

Audience numbers & engagement insights

Audience details

Podcast Insights

Podcast episodes

Check latest episodes from Inspiration Katta : Marathi Podcast - इन्स्पिरेशन कट्टा - मराठी पॉडकास podcast


EP 62 - कॉर्पोरेट जॉब ते आवडते काम - मार्ग कसा शोधावा ? Ft -Sharayu Sawant
2023/11/24
कॉर्पोरेट मध्ये काम करता आहे का ? वयाची तिशी पार केली आहे ? असं असेल तर हा एपिसोड तुमच्यासाठी आहे. कॉर्पोरेट जॉब मध्ये कंटाळा येणं, निराशा येणं, वरिष्ठांशी भांडण होणं, नको तितक्या स्पर्धेचा तिटकारा येणं असे अनेक प्रकार खूप घडतात. त्यातून पुढे चुकीचे निर्णय घेणं, नैराश्य येणं, वर्क-लाईफ बॅलेन्स बिघडणं अशे प्रकार घडतात. त्यांचा परिणाम घरी भांडण, मुलांवर चिडचिड आणि मानसिक आजार ह्या पर्यंत होतो. ज्या वेळेला पहिल्यांदा असं वाटायला सुरवात होते ना कि हे काम माझ्या साठी नाही, त्या वेळेलाच ह्या सगळ्याची सुरवात कदाचित झालेली असते. पण आपण ते सहन करत राहतो आणि एक दिवस ज्याला टिपिंग पॉइंट म्हणतात तिथे येऊन आपण पोहचतो. त्यापुढे सहन करत राहणं ह्या शिवाय आपल्याकडे दुसरा पर्याय नसतो कारण आपल्यावर जबाबदाऱ्या आलेल्या असतात. टिपिंग पॉइंट पर्यंत पोहचण्या आधीच आपण बाहेर पडू शकतो का? स्वतः साठी वेगळे पर्याय शोधू शकतो का? कुठलं काम आवडत आहे ह्याचा शोध आधीच घेऊन ठेऊ शकतो का ? comfort zone च्या बाहेर पडायला काय लागत ? ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तर शोधण्याचा प्रयत्न ह्या भागात आपण केला आहे. आजची आपली पाहुणी शरयू सावंत हि अनेक वर्षांचा कॉर्पोरेट अनुभव घेऊन आता स्वतः एक लाईफ कोच बनली आहे आणि ती लोकांना आणि विशेषतः महिलांना करिअर आणी व्यवसायासंबंधी कोचिंग करते. Instagram: https://www.instagram.com/iamsharayusawant PODCAST LINK: Apple Podcast: https://apple.co/3g9fekx Spotify: https://spoti.fi/3gpYdS5 FREE EBBOK: 'EMBODIED SUCCESS' The Art of Overcoming Limitations & Stress to Achieve Greater Success & Abundance https://go.sharrayu.com/ebook-optin पुस्तकं विकत घेण्यासाठी लिंक्स जो जे वांछील - https://amzn.to/3QVShUq पॉडकास्टिंग - डिजिटल आवाजाची दुनिया - https://amzn.to/49DUj2X ऑडिओ लोगो क्रेडिट - Tejashrri Fulsounder - https://www.instagram.com/rjteju_ #inspiration #inspirationkatta #nachiketkshire #marathipodcast #marathi #मराठी --- Send in a voice message: https://podcasters.spotify.com/pod/show/nachiket-satish-kshire/message
EP 61. - जिद्द - अरुणिमा सिन्हाची गोष्ट
2023/11/05
आपलं ध्येय सध्या न करण्यासाठी आपण स्वतःला कोणतं कारण देतो आहे ? वेळ नाही ! नशीब नाही ! गाईड मिळत नाही ! की इतर कोणतं कारण ? एकदा अनुरिमा सिंन्हा आणि तिच्या जिद्दीची हि गोष्ट ऐका आणि मग स्वतःच कारण किती योग्य आहे ते ठरावा. ऑडिओ लोगो क्रेडिट - Tejashrri Fulsounder - https://www.instagram.com/rjteju_/ #inspiration #inspirationkatta #nachiketkshire #marathipodcast #marathi #मराठी Marathi Podcast । मराठी पॉडकास्ट --- Send in a voice message: https://podcasters.spotify.com/pod/show/nachiket-satish-kshire/message
EP 60 - Resilience | हिरु ओनाडा ची गोष्ट
2023/10/29
गोष्ट ऐकायला आवडत नाही असा माणूस सापडणे कठीण. आजीच्या मांडीवर डोकेठेवून, शाळेच्या बाकावर, कॉलेज च्या कट्ट्यावर किंवा ऑफिसच्या कॅन्टीनमध्ये कुठेही आपल्याला गोष्टी ऐकायला आवडतात. आपल्या पॉडकास्टच्या नावातच कट्टा असल्यामुळे इथे गोष्टी असणारच. आपण नेहमी प्रेरणादायी लोकांच्या गोष्टी त्यांच्या आवाजात ऐकतो, आज एक नवीन प्रयोग करून बघतो आहे. माझ्या आवाजात एक गोष्ट सांगायचं हा प्रयत्न आहे. आत्ता पर्यंत माझ्या प्रयोगांना तुमची साथ मिळाली आहेच, आता पण द्याल अशी विनंती करतो आणि आशा करतो. ऑडिओ लोगो क्रेडिट - Tejashrri Fulsounder - https://www.instagram.com/rjteju_/ #inspiration #inspirationkatta #nachiketkshire #marathipodcast #marathi #मराठी गोष्टी - स्वप्नरंजन - प्रकटीकरण --- Send in a voice message: https://podcasters.spotify.com/pod/show/nachiket-satish-kshire/message
कचऱ्यातून रोजगार आणि उद्योगनिर्मिती - EP - 59 - Amita Deshpande - reCharkha - The EcoSocial Tribe
2023/10/21
कचऱ्यातून रोजगार आणि उद्योगनिर्मिती - EP -५९ - Ft अमिता देशपांडे ( Amita Deshpande - reCharkha - The EcoSocial Tribe) आपण जगात कुठेही गेलो तरी प्रत्येक शहराच्या बाहेर, इतकंच काय छोट्या गावांच्या ही बाहेर एक डम्पिंग यार्ड, म्हणजे तिथला कचरा डंप करण्याची जागा असतेच. ह्याला लँडफिलही म्हणतात. तुम्ही जर देवनार- मुंबई, उरुळी देवाची - पुणे, भांडेवाडी - नागपूर , मोशी - PCMC हि ठिकाणं ( किंवा इतर कुठलेही डम्पिंग यार्ड) बघितली असतील तर तुम्हाला लक्षात येईल की आपला कचरा डंप करायला किती मोठी जागा लागते. असं म्हणतात सध्या भारतातल्या सगळ्या डम्पिंग यार्ड चे एकूण क्षेत्रफळ हे पुणे शहरा एवढे आहे, २०३० मध्ये ते बंगलोर शहरा एवढे आणि २०५० पर्यंत दिल्ली एवढे होणार आहेत. आपल्या देशात जिथे जमिनीची किंमत खूप जास्त आहे, बहुसंख्य लोकांकडे स्वतःची जमीन नाही आहे, तिथे एवढ्या मोठ्या जागेचा वापर कचरा डंप करण्यासाठी आपण करतो आहे ह्याचा अर्थ आपलं काही तरी चुकतं आहे. कचरा मुळात कमी तयार होणं आवश्यक आहेच, आणि त्यासाठी काय बदल करावे लागतील ह्या बद्दल आपण ह्या भागात चर्चा केली आहेच, पण त्याच बरोबर कचरा कमी करूनही उरलेला कचरा, कसा रोजगारनिर्मिती करून देऊ शकतो आणि अमिता देशपांडे हिने, कचऱ्यातून ग्रामीण भागात रोजगारनिर्मिती आणि wealth creation कशी होऊ शकते ह्याचं उत्तम उदाहरणं तिच्या recharkha ह्या उपक्रमातून कसं घालून दिलं आहे ह्या बद्दलही गप्पा केल्या आहेत. REcharkha - https://www.recharkha.org इंस्टाग्राम - https://www.instagram.com/recharkha_ecosocial/ YouTube - https://youtube.com/@myecosocialplanetrecharkha8692?si=Ut8mZPdAlT-ogqDp ऑडिओ लोगो क्रेडिट - Tejashrri Fulsounder - https://www.instagram.com/rjteju_/ #inspiration #inspirationkatta #nachiketkshire #marathipodcast #marathi #मराठी --- Send in a voice message: https://podcasters.spotify.com/pod/show/nachiket-satish-kshire/message
Comfort Zone च्या बाहेर येऊन काम करावं का ? EP 58 - Ft Saumitra Pote & Niranjan Medhekar
2023/10/14
ठेविले अनंते तैसेचि राहावे.. जे आहे त्यात सुखी असं जे वागतात आहे ना आणि ज्यांना आजच्या काळात खरंच, मनापासून असं वाटतं आहे ना, त्यांना माझा सलाम. आजच्या aspirational जगात आपल्यापैकी जास्तीत जास्त लोकांना काही तरी वेगळं, चांगलं करायची इच्छा होत असते. पण जास्तीत जास्त लोकांची हि इच्छा मनात किंवा बोलण्यातच राहते, ती कृतीत उतरत नाही. ह्याचं कारण म्हणजे कृती करणं सोपं नसतं, त्या साठी आपल्या comfort zone च्या बाहेर पडावं लागतं, मेहेनत करावी लागते आणि थोडी रिस्क पण घ्यायला लागते. सौमित्र पोटे आणि निरंजन मेढेकर हे दोघे माझे सह पॉडकास्टर आणि मराठी पॉडकास्टर ग्रुपचे सदस्य आहेच त्याच बरोबर माझे मित्र पण आहेत. ह्या दोघांमधला कॉमन दुआ म्हणजे, हे दोघेही mainstream media मधले मोठे ब्रँड सोडून नवीन माध्यमांकडे वळले. कसा होता हा प्रवास, comfort zone सोडायला काय लागतं ? पॉडकास्ट आणि नवीन मीडिया माध्यमांचे फायदे अश्या अनेक विषयांवर गप्पा केल्या आहेत आजच्या ह्या भागात. सौमित्र पोटे चा मित्रम्हणे हा पॉडकास्ट सध्या खूप गाजतो आहे, तर निरंजन हा एक उत्तम कादंबरीकार बनला आहे, त्याचे पुस्तक स्टोरीटेल आणि पुस्तकं स्वरूपात उपलब्ध आहेत, त्याच बरोबर मराठी crime कथा हा त्याचा पॉडकास्ट नक्की ऐकण्यासारखा आहे. [ comfort zone, career risk, stagnation, growth, inspiration, new age media, podcasting ] #inspiration #inspirationkatta #nachiketkshire #marathipodcast #marathi #मराठी ऑडिओ लोगो क्रेडिट - Tejashrri Fulsounder - https://www.instagram.com/rjteju_/ --- Send in a voice message: https://podcasters.spotify.com/pod/show/nachiket-satish-kshire/message
पोलिसांकडून आपल्याला हे शिकायला मिळतं.. EP 57 - Ft PRAMOD PHALNIKAR
2023/10/07
श्री प्रमोद श्रीपाद फळणीकर हे मध्यप्रदेश कॅडर चे IPS ऑफिसर. त्यांनी तिथे अनेक ठिकाणी सेवा दिली. त्यानंतर ते ITBP ( इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीस ) ; NSG ( नॅशनल सेक्युरिटी गार्ड ) ; CISF ( सेंट्रल इंडस्ट्रियल सेक्युरिटी फोर्स ) अश्या महत्वाच्या संस्थांमध्ये काम केलं. CISF मध्ये असताना संपूर्ण भारतातल्या विमानतळांची सुरक्षा त्यांच्या अधिकाराखाली होती. त्यांच्या करिअर मध्ये अनेक रोमांचक घटना घडल्या, पण इन्स्पिरेशन कट्टा वर गप्पा मारताना आपण सरांकडून जास्तीत जास्त शिकता येईल ह्या उद्देशाने त्या घटनांवर एपिसोड आधारित न ठेवता पोलिसांकडून एकंदरीत आपण सर्वसामान्यांना काय शिकता येईल ह्या बद्दल चर्चा केली. IPS मध्ये त्यांची सुरवात थोडी उशिरा झाली, त्यामुळे त्यांना काही अडचणी आल्या का ? करिअर मध्ये एखादी गोष्ट मिळायला उशीर झाला तर त्यांनी पुढच्या आयुष्यात काही नुकसान होतं का ? त्याच्याशी कसं डील करायचं ? आपल्याला वाटतं आयुष्यात कुठलही शिक्षण पूर्ण करणं म्हणजे परीक्षा पास होण. पण IPS झाल्यावरही सतत अभ्यास करायला लागतो, update राहायला लागतं. इतक्या व्यस्त दिनक्रमांतून ते नवीन शिक्षणाला कसं प्राधान्य देतात ? सिव्हिलिअन्स स्वतःला update ठेऊ शकतात का ? जो माणूस फील्ड work करतो त्याला paper work चा खूप कंटाळा येतो, पण पोलिसांना दोन्ही काम करणं क्रमप्राप्त होत. हे कसं जमतं ? आपल्याला वाटतं आपला जॉब हा thankless आहे, पण law enforcement agencies पेक्षा जास्त thankless job कोणाचा असू शकेल? असं असलं तरी काम करायचं inspiration कसं मिळतं ? अश्या वेगवेगळ्या विषयांवर गप्पा करून सरांकडून खूप छान शिकायचा हा प्रयत्न.. सरांचा मोबाईल नंबर - ९००११९४३६७४ #inspiration #inspirationkatta #nachiketkshire #marathipodcast #marathi #मराठी ऑडिओ लोगो क्रेडिट - Tejashrri Fulsounder - https://www.instagram.com/rjteju_/ --- Send in a voice message: https://podcasters.spotify.com/pod/show/nachiket-satish-kshire/message
पॉडकास्ट मधून प्रबोधन - EP 56 - Ft Dwitiya Sonavane , Shilpa Yadnopavit , Mukta Chaitanya
2023/09/29
कुठल्याही इतर माध्यमांसारखं इंटरनेट हे दुधारी तलवारीसारखं आहे. त्याचा चांगला आणि वाईट अश्या दोन्ही प्रकारे वापर करून घेता येतो. इंटरनेट मुळे सोशल मीडिया, गेमिंग आणि इतर गोष्टींमागे वाहावत गेलेली लोकही आपण बघतो, तेच इंटरनेट चा वापर करून आपला घरगुती उद्योग वाढवायला आणि स्वतःसाठी काहीतरी नवीन शिकायला केलेला वापर हि आपण बघतो. पॉडकास्ट हे ह्या इंटरनेट मुळे आपल्याला मिळालेले एक उत्तम माध्यम आहे ह्या बाबत आता कोणाला काही शंका उरली नसेल. ट्रॅफिक मध्ये गाडी चालवताना, सकाळी वॉल्क करताना, स्वयंपाक करताना, प्रत्येक वेळेस मनोरंजनासाठी काही तरी ऐकण्या पेक्षा तो वेळ स्वतःसाठी काही तरी नवीन माहिती किंवा शिक्षण घेण्यासाठी वापरू शकतो हि संकल्पना आता हळू हळू लोकांना पटू लागली आहे. पण सगळ्याठिकाणी असतं तसंच, इथेही आहेच, मुर्गी पहेले की अंडा ? श्रोते पहिले येतील का निर्माते ? मला विचारालं तर श्रोते येतातच, चांगले निर्माते हवे. इकोसिस्टिम तयार व्हायला हवी. आम्ही मराठी पॉडकास्टर्स मिळून ह्या साठी प्रयत्न करतोच आहे. त्याचा भाग म्हणून माझ्या श्रोत्यांना इन्स्पिरेशन कट्टा सारखे ( सेल्फ हेल्प ) काही तरी नवीन माहिती / शिक्षण देणारे इतर काही पॉडकास्ट बद्दल माहिती व्हावी म्हणून आजच्या पॉडकास्ट दिनानिमित्य हा एपिसोड. मला सगळ्याच माझ्या मित्र मैत्रिणींना ह्या एपिसोड मध्ये सामील करून घ्यायला आवडलं असतं, पण ते तांत्रिक कारणांमुळे शक्य नव्हतं, त्यामुळे www.marathipodcasters.com ह्या संकेत स्थळाला नक्की भेट द्या, आणि ज्या पॉडकास्ट अँप वर तुम्ही पॉडकास्ट ऐकता तिथे पण मराठी पॉडकास्ट search करून नक्की ऎका. ह्या भागात सहभागी लोकांच्या पॉडकास्ट लिंक्स १) ग्रंथप्रेमी ( द्वितीया सोनावणे ) - https://open.spotify.com/show/0A0NHhV6vFMcFnGviiVJMV?si=b68799c70eb34766 २) सेल्फलेस पॅरेंट
पालक आणि विद्यार्थी मित्रानो - जरा आमचं 'ऐकाकी' - EP 55 - SACHIN PANDIT
2023/09/24
वर्गात काय शिवतात ते समजतं नाही आहे? समजलं आहे पण खूप आधीच्या धड्यांचा विसर पडला आहे? परीक्षेआधी परत कोणाच्या तरी मार्गदर्शनाखाली उजळणी करायची आहे ? स्क्रीन कडे न बघता अभ्यास अभ्यास करायचा आहे ? अंध विद्यार्थ्यांना पुस्तकाचा पर्याय हवा आहे ? ह्या सगळ्याच उत्तर म्हणजे श्राव्य रूपात समजावून सांगितलेले पाठ्यपुस्तकातील धडे. हीच संकल्पना घेऊन सचिन पंडित ह्यांनी 'ऐकाकी' अँप ची सुरवात केली. ह्या अँप मुले वरील सर्व समस्यांसाठी एक उपाय मिळाला. हि अँप सुरु करताना केलेले सर्वे, विद्यार्थी -पालक - शिक्षक ह्यांच्याशी झालेले संवाद, ह्यातून सचिनला अनेक नवीन समस्यांबद्दल माहिती मिळाली, ती माहिती आणि त्याबद्दल संभाव्य उपाय लोकांसमोर आणायला सचिनने एक पॉडकास्ट पण सुरु केला. ऐकाकी अँप, पॉडकास्ट, विद्यार्थी -पालक - शिक्षक ह्यांच्या समस्या, त्यावर उपाय, श्राव्य रूपात शिक्षणाचे भविष्य ह्या सगळ्यावर चर्चा केली आहे इन्स्पिरेशन कट्टाच्या ५५ व्या भागात उद्योजक आणि पॉडकास्टर सचिन पंडित ह्यांच्याशी. ऐकाकी अँप लिंक्स - https://apps.ikakey.com/ ऐकाकी पॉडकास्टच्या लिंक्स - https://tinyurl.com/ikakeySPOTIFY https://tinyurl.com/ikakeyAPPLE #inspiration #inspirationkatta #nachiketkshire #marathipodcast #marathi #मराठी ऑडिओ लोगो क्रेडिट - Tejashrri Fulsounder - https://www.instagram.com/rjteju_/ --- Send in a voice message: https://podcasters.spotify.com/pod/show/nachiket-satish-kshire/message
EP 54 - साठाव्या वाढदिवसाला चक्क ६०KM धावल्या - Ft Vidula Tokekar
2023/09/17
निसर्गोपचार - भाग ५४ - विदुला टोकेकर / EP 54 - Vidula Tokekar तुम्हाला तुमच्या आरोग्याकडे लक्ष द्यायचं आहे, पण वेळ मिळत नाही आहे. वयाच्या चाळीशीत, तिशीत किंवा अगदी विशीत थकवा जाणवतो आहे ? एनर्जी, स्टॅमिना कमी होताना जाणवतो आहे. तर मग हा एपिसोड तुमच्या करता आहे. अगदी नैसर्गिक पद्धतीने निरोगी कसं राहता येतं, निषारोपचार पद्धत नेमकी काय आहे, सुरवात कुठून करावी अश्या मुद्द्यांवर चर्चा केली आहे विदुला टोकेकर ह्यांच्याशी. त्यांनी सुचवलेले पुस्तक - स्वाधीन स्वास्थ्य महाविद्या by आचार्य को लक्ष्मण शर्मा this is the bible of Naturopathy. विदुला टोकेकर ह्यांच्या कडून निसर्गोपचारा बद्दल अधिक जाणून घेण्यासाठी, त्यांची अपॉइंटमेंट इथे बुक करू शकता - https://tidycal.com/vidulatokekar/prakruti-free-consultation प्रकृती पॉडकास्ट ची लिंक - https://open.spotify.com/show/4ZbMaCk5q2FfWH5h01AIsr?si=deaff9286ce546d3 #inspiration #inspirationkatta #nachiketkshire #marathipodcast #marathi #मराठी ऑडिओ लोगो क्रेडिट - Tejashrri Fulsounder - https://www.instagram.com/rjteju_/ --- Send in a voice message: https://podcasters.spotify.com/pod/show/nachiket-satish-kshire/message
EP 53 - लॉकडाउन चे फायदे !!
2023/03/21
भाग ५३ -लॉकडाउन चे फायदे !! २२ मार्च २०२० म्हणजे आज पासून ३ वर्षांपूर्वी जनता curfue आपण पाळला होता, आणि लगेच दुसऱ्यादिवशी पासून lockdown ची सुरवात झाली. आधी काही दिवसांचा वाटणारा lockdown पुढे अनेक महिने चालला. हा काळ अनेक लोकांसाठी अतिशय कठीण असा काळ होता, खूप लोकांना खूप अडचणी आल्या. आपण कल्पनापण करू शकणार नाही अश्या गोष्टी घडल्या. हे सगळं असं असताना, काही लोकांनी मात्र वेळेचा चांगला उपयोग करून, काही तरी नवीन उपक्रम सुरु केले. काही तरी नवीन शिकून स्वतःच्या आयुष्याला नवीन वळण दिलं. ज्या लोकांनी ह्या lockdown चा blessing in disguise ह्या तत्वावर फायदा करून घेतला त्या लोकांच्या stories आपण इन्स्पिरेशन कट्ट्यावर आणतो आहे. त्यातला हा पहिला भाग. #inspiration #inspirationkatta #nachiketkshire #marathipodcast #marathi #मराठी आमच्या वेबसाईट ला नक्की भेट द्या - https://marathipodcasters.com मी पॉडकास्टर  - https://www.instagram.com/mipodcaster/ ई-मेल - [email protected] ह्या भागाचे प्रयोजाय - प्रफुल्लता प्रकाशन देवयोद्या हि कादंबरी इथे ऑर्डर करू शकता You can also order this book online here : https://granthpremi.com/products/devyoddha तुम्ही कॅश ऑन डिलिव्हरी पर्यायासाठी अमेझॉन वर ऑर्डर करू शकता. http://bitly.ws/yLa2 ही कादंबरी तुम्ही WhatsApp मेसेज करुन अथवा फोन वर कॉल करून देखील ऑर्डर करू शकता. COD (कॅश ऑन डेलिव्हरी) सुविधा उपलब्ध! फोन नंबर - ९६२३२१८६२५ / ऑडिओ लोगोस - Tejashrri Fulsounder - https://www.instagram.com/rjteju_/ --- Send in a voice message: https://podcasters.spotify.com/pod/show/nachiket-satish-kshire/message
EP 52 - जुन्या लग्नाची नवी गोष्ट
2023/02/12
फेब्रुवारी महिना, गुलाबी थंडी आणि उद्यावर आलेला valentine's day.. छान रोमँटिक गाणे आठवतात आहे ना?  पहिलं प्रेम आठवतं आहे का? आपले किंवा मित्रांचे प्रेमभंग आठवतात आहे का? अश्यातच पुढे अनेकांचे प्रेमविवाह पण झाले असतील आणि काहींचे विवाहानंतर प्रेमही.. लग्न होत, हनिमून होतं, पाहिलं वर्ष छान उत्साहात जातात, आणि मग हळू हळू बारीक सारीक गोष्टी कळायला लागतात.  रोज दारू पिण्याची अगदी भयंकर सवय असो किंवा ओला टॉवेल गादीवर ठेवायची छोटी पण irritating सवय.  खटके उडायला सुरूवत होते, मग त्याचं रूपांतर भांडणात आणि कधी कधी घटास्पोटात पण.. १० वर्षांच्या relationship नंतर माझा घटस्फोट होईल असं मला स्वप्नातही वाटलं नव्हतं. माझ्या जवळच्या नात्यातील अजून एकाचं लग्नाला १२ वर्ष झाल्यावर घटस्फोट झाला. अनेक मित्रं मैत्रीच्या कडे अशी परिष्टित असल्याचे ऐकिवात आहे.. का होत आहे असं? Mid life divorce ची संख्या वाढते आहे का? पस्तिशी येता येताच married life एकसंध आणि बोरिंग व्यायला लागली आहे का? काय कारण आहेत ह्याची? आणि हे बदलायच असेल तर काय उपाय आहे?  ह्या एका महत्त्वाच्या विषयावर हा valentine's day special episode.. #inspiration #inspirationkatta #nachiketkshire #marathipodcast #marathi #मराठी #sleep #qualitysleep #wakingupearly #लवकरउठणे आमच्या वेबसाईट ला नक्की भेट द्या - https://marathipodcasters.com मी पॉडकास्टर  - https://www.instagram.com/mipodcaster/ ई-मेल - [email protected] ह्या भागाचे प्रयोजाय - प्रफुल्लता प्रकाशन देवयोद्या हि कादंबरी इथे ऑर्डर करू शकता You can also order this book online here : https://granthpremi.com/products/devyoddha तुम्ही कॅश ऑन डिलिव्हरी पर्यायासाठी अमेझॉन वर ऑर्डर करू शकता. http://bitly.ws/yLa2 ही कादंबरी तुम्ही WhatsApp मेसेज करुन अथवा फोन वर कॉल करून देखील ऑर्डर करू शकता. COD (कॅश ऑन डेलिव्हरी) सुविधा उपलब्ध! फोन नंबर - ९६२३२१८६२५ / ह्या भागात सहभागी लोकं १) लीना परांजपे   - https://www.instagram.com/leennaparannjpe/ २) चित्कला मुळे  - https://www.instagram.com/relationshipcoachchitkala/ ३) डॉ प्रसन्ना गद्
EP 51 - सकाळी लवकर उठावे का? / Sleep and Waking up early
2023/01/30
५१ सकाळी लवकर उठावे का? अनेक दिवसांपासून, infact अनेक महिन्यांपासून सकाळी लवकर उठण्याचा मी प्रयत्न करतो आहे, पण काही जमलं नाही बुआ.. मग ठरवलं ह्या विषयावर एपिसोड करायचा. सुरवातीला लोकांना त्याचे फायदे विचारात गेलो, पण नंतर हळू हळू लक्षात आलं की मी प्रश्नच चुकीचा घेतला आहे !  लवकर उठणे हा विषय असूच शकत नाही.. झोप हा मुख्य विषय आहे.. quality झोप म्हणजे काय, ती किती वेळची असायला हवी,  झोपेची वेळ, कशी मिळू शकते अश्या सगळ्या गोष्टींवर चर्चा करणं आवश्यक ठरलं. ह्या विषयावर आयुर्वेद, आहारशास्त्र, निसर्गोपचार, मानसशास्त्र काय म्हणत ह्या बद्दल ह्या एपिसोड मध्ये cover करायचा प्रयत्न केला आहे.. #inspiration #inspirationkatta #nachiketkshire #marathipodcast #marathi #मराठी #sleep #qualitysleep #wakingupearly #लवकरउठणे  आमच्या वेबसाईट ला नक्की भेट द्या - https://marathipodcasters.com मी पॉडकास्टर  - https://www.instagram.com/mipodcaster/ ई-मेल - [email protected]  ह्या भागाचे प्रयोजाय - प्रफुल्लता प्रकाशन  देवयोद्या हि कादंबरी इथे ऑर्डर करू शकता  You can also order this book online here :https://granthpremi.com/products/devyoddha तुम्ही कॅश ऑन डिलिव्हरी पर्यायासाठी अमेझॉन वर ऑर्डर करू शकता. http://bitly.ws/yLa2 ही कादंबरी तुम्ही WhatsApp मेसेज करुन अथवा फोन वर कॉल करून देखील ऑर्डर करू शकता. COD (कॅश ऑन डेलिव्हरी) सुविधा उपलब्ध! फोन नंबर - ९६२३२१८६२५ / ह्या भागात सहभागी लोकं  १) डॉ कीर्ती पुराणिक तारे   - https://www.drkirti-arogyam.com/ २) अवंती दामले - https://www.instagram.com/avantidamle/ ३) डॉ यश वेलणकर - https://www.linkedin.com/in/yash-velankar-83362510/ ४) विदुला टोकेकर  - https://www.instagram.com/vidulatokekar/ ५) मुक्त चैतन्य  - https://www.instagram.com/muktachaitanya/ विशेष आभार - प्रकाश अय्यर ( the habit of winning ) ह्या पुस्तकातून अलार्म आणि स्नूझ ह्या बद्दल प्रेरणा मिळाली  - अंकुर वारिकू ह्याच्या पुस्तकातला भाग त्याला क्रेडिट देऊन वापरला आहे.   ऑडिओ लोगोस - Tejashrri Fulsounder - https://www.instagram.com/rjteju_/ --- Send in a voice message: https://podcasters.spotify.com/pod/show/nachiket-satish-kshire/message

Podcast reviews

Read Inspiration Katta : Marathi Podcast - इन्स्पिरेशन कट्टा - मराठी पॉडकास podcast reviews


0 out of 5
0 reviews

Podcast sponsorship advertising

Start advertising on Inspiration Katta : Marathi Podcast - इन्स्पिरेशन कट्टा - मराठी पॉडकास relevant audience podcasts


What do you want to promote?