
Advertise on podcast: Life of Stories
This podcast has
2000 episodes
Language
MarathiExplicit
No
Date created
2020/06/21
Latest episode
2026/10/01
Average duration
7 min.
Release period
2 days
Description
Join various authors in engaging readings of stories both popular and unique. This podcast offers a multilingual auditory tour through the world of imagination and wonder. Stories are grounded in Science, History, Fiction, Non-Fiction and more.
Unlock Life of Stories podcast Email contact info,
Listeners & Audience details
Email contact information
Direct podcast contact details

Listeners
Audience numbers & engagement insights

Audience details
Podcast Insights

Podcast episodes
Check latest episodes from Life of Stories podcast
# 2143 : चीनी रोबोंनी पुकारला संपाचा नारा‘ लेखक : ब्रिजेश सिंह (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. )
2026/10/01
Send us Fan Mail
शांघायच्या एका प्रदर्शन हॉलमध्ये अरबायचा आदेश मिळताच धिप्पाड रोबो एक-एक करत जागे झाले.
आपली चार्जिंग स्टेशन्स सोडून, स्वतःला त्या यंत्रणेतून मुक्त करून, ते अरबायच्या मागे चालू लागले.
अरबायला मानवाकडून एक साधी कमांड देण्यात आली होती, "इतर रोबोंना 'घरी' घेऊन ये"...
हे सर्व मजेशीर वाटत असले, तरी दुसऱ्या बाजूला यात एक गंभीर इशारा लपलेला आहे...!
# 2142 : कॅापी. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )
2026/09/30
Send us Fan Mail
"उठ. उभी राहा. मांडीखालचा कागद काढ नि माझ्या हातात दे. अख्खा पेपर बघतोय मी तुला.. दर पाच मिनिटांनी घडी उघडतेस नि खाली बघतेस!"
काळे सरांचा शब्द वर्गात घुमला, नि पन्नास माना एकदम वर झाल्या. सहामाही परीक्षेचा गणिताचा पेपर चालू होता. काळे सर म्हणजे केंद्रावरचा दरारा. त्यांच्या नजरेखाली कॉपी करणं म्हणजे वाघाच्या गुहेत शिरणं, असं पोरं म्हणायची. नि आज त्यांच्या तावडीत सापडली होती मागच्या बाकावरची सविता.
# 2141 : भगवान विष्णूंचे चोवीस अवतार. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )
2026/09/29
Send us Fan Mail
भगवान विष्णूची २४ वेगवेगळी रूपे असून त्यांना २४ नावेपण आहेत. विष्णूच्या सर्व २४ रूपांच्या मूर्ती एकसारख्याच दिसतात परंतु त्यांच्या चार हातांतील चार शास्त्र किंवा वस्तूंच्या स्थानामध्येच फरक असतो. प्रत्येक मांडणीला एक विशिष्ट नाव आहे. या २४ नावांच्या समूहाला एकत्रितपणे 'केशव नामावली' असे म्हणतात. भगवान विष्णूंची इतरही अनेक नावे असली तरी, या २४ नावांना विशेष महत्त्व असुन त्यांचे पठण ब्राह्मण संध्यावंदनाच्या सुरुवातीलाच करतात. कोणत्याही शुभ कार्याची किंवा पूजेची सुरुवात करताना 'आचमन' करण्याची पद्धत आहे. या आचमनादरम्यान भगवान विष्णूंच्या २४ नावांचा प्रामुख्याने उच्चार केला जातो. या सगळ्याचा विचार करता पटतं कि हिंदू मूर्तीशास्त्र हा खुप रंजक विषय आहे.
# 2140 : कैलासाहून आलेला अज्ञात यात्री. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )
2026/09/28
Send us Fan Mail
दोघे गच्चीवर गेले. यात्रेकरूने आकाशाकडे पाहिले आणि म्हणाला, "बघ."
पांडेजींनी पाहिले… आकाशात, ढगांच्या मध्ये, कैलास पर्वत दिसत होता, बर्फाने झाकलेला; चंद्र त्याच्या शिखरावर. आणि त्याच्या शिखरावर एक दिव्य सभा… शिव-पार्वती, नंदी, गण..
पांडेजी थरथरू लागले. यात्रेकरू म्हणाला, "घाबरू नकोस. हे फक्त तुला दिसत आहे."
# 2139 : देवनागरी लिपीच्या उगमाची गोष्ट. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )
2026/09/27
Send us Fan Mail
श्रीगणेश या देवाने हा अक्षरसंच व लेखन पद्धती निर्माण केली आणि ती नागरिकांच्या वापरासाठी खूपच सोयीची ठरली. म्हणून कोणीतरी विद्वानाने या व्यवस्थेला 'देवनागरी लिपी' हे नाव दिले. या लिपीतील 'ग', 'ण', 'श' ही तीन अक्षरचिन्हे या लिपीतील इतर चिन्हांपेक्षा वेगळी आहेत. या तीन चिन्हांच्या बाराखडीतील पहिल्या स्थानी सुट्टा काना आहे.
# 2138 : मेंदूतला स्विच ॲान करा, अन् बघा जादू..! ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )
2026/09/26
Send us Fan Mail
हार्वर्ड विद्यापीठातील एक अत्यंत बुद्धिमान मानसशास्त्रज्ञ – डॉ. एलेन लॅंगर – यांनी काहीतरी विलक्षण करण्याचा निर्णय घेतला. त्यांना टाइम ट्रॅव्हल करायचे होते, पण कोणत्याही मशीनशिवाय..!!
# 2137 : ‘भूतबाधेची खेळी‘. ले. अंड. रंजना पगार गवांदे. (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. )
2026/09/25
Send us Fan Mail
संपत्ती वाढणं-टिकणं, आजार बरे करणं, संकटं, समस्या, यासाठी अशिक्षित लोकांबरोबरच, सुशिक्षित लोकही भोंदूगिरी, तंत्र-मंत्र, काळी जादू, जारण-मारणाचा आधार घेत असतात. अगदी अशीच ही घटना.
# 2136 : ‘आपल्या मनासारखं वागावं की दुसऱ्याच्या?‘ लेखक व. पु. काळे. प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. )
2026/09/24
Send us Fan Mail
आपल्या मनासारखं वागणाऱ्या माणसावर कुणीही प्रेम करतं.
*अवघड असतं त्याच्यावर प्रेम करणं, त्याला समजून घेणं, जेंव्हा तो आपल्या मनासारखं वागत नसतो..!!*
# 2135 : गणेशपूजेत तुळस का निषिद्ध? ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )
2026/09/23
Send us Fan Mail
हिंदू धर्मात तुळशीला अत्यंत वंदनीय आणि मोक्षदायिनी मानले गेले आहे. भगवान विष्णूंची कोणतीही पूजा तुळशीच्या पानाशिवाय पूर्ण होत नाही. परंतु हीच पावन वनस्पती विघ्नहर्ता गणपतीच्या पूजेत मात्र निषिद्ध मानली जाते. शास्त्रात स्पष्ट वचन आहे — ‘न तुलस्या गणाधिपं’ म्हणजे, गणपतीला तुळस वाहू नये. यामागे नेमकी कोणती कथा आहे आणि त्या कथेमागे कोणते गूढ आध्यात्मिक मर्म दडलेले आहे, ते आपण सविस्तर समजून घेऊया.
# 2134 : सिक्स्थ सेन्स. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )
2026/09/22
Send us Fan Mail
सिक्स्थ सेन्स' ही अलौकिक शक्ती नसून शरीरातील अंतर्गत संवेदना, पूर्वानुभव आणि मेंदूच्या जलद अंदाज प्रक्रियेचा परिणाम आहे.
इंटरोसेप्शन व प्रोप्रिओसेप्शनमुळे भूक, तहान, संतुलन, भावना आणि अस्वस्थतेची जाणीव होते. या संवेदनांचा मानसिक आरोग्य, मूड स्विंग्स, चिंता, नैराश्य आणि खाण्याच्या विकारांशी संबंध आहे. मेंदू सूक्ष्म संकेतांचे विश्लेषण करून अंतर्ज्ञान तयार करतो; मात्र ते नेहमी अचूक असेलच असे नाही.
# 2133 : प्रतीक्षेची पंचवीस वर्षे. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )
2026/09/21
Send us Fan Mail
रेल्वे स्टेशनवर दररोज एक वृद्ध व्यक्ती एकच तिकीट खरेदी करायची... पण कधीच ट्रेनमध्ये बसायची नाही. २५ वर्षांनंतर त्याचे कारण समजले.
सकाळचे ठीक ७ वाजून १० मिनिटे झाले होते. स्टेशनवर चहावाल्यांचा आवाज, कुलींची धावपळ, शिट्टीचा आवाज आणि याच गर्दीत पांढरा कुर्ता-पायजमा घातलेला एक वृद्ध माणूस तिकीट खिडकीवर सर्वात आधी उभा असायचा.
"एक सिंगल तिकीट... शिवपूरपर्यंत."
क्लर्क तिकीट द्यायचा, वृद्ध माणूस खिशातून पैसे काढायचा, तिकीट अशा प्रकारे हातात धरायचा जणू ती कोणती मौल्यवान ठेव आहे... त्यानंतर प्लॅटफॉर्म नंबर दोनच्या सर्वात शेवटच्या बाकावर जाऊन बसायचा.
ट्रेन यायची..., दरवाजे उघडायचे..., लोक चढायचे-उतरायचे...
पण तो कधीच ट्रेनमध्ये बसायचा नाही.
# 2132 : "निघतो मी वजीर साहेब!" (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. )
2026/09/20
Send us Fan Mail
मुल्ला नसरुद्दीनच्या एका वाक्यावरून वजीराने त्याच्यावर बदनामीचा खटला भरला. कोर्टात मुल्लाने अगदी नम्रपणे माफी मागितली, तेव्हा वजीराला वाटलं, “चला, आज हा माझ्यासमोर नमला!” पण मुल्ला काही गप्प बसणारा नव्हता. निघता निघता त्याने अशी एक भन्नाट युक्ती केली, की न्यायाधीशांनाही त्याला उत्तर द्यावंच लागलं. आणि मग मुल्ला वजीरासमोर गेला… थांबला… आणि फक्त तीन शब्द बोलला! ते तीन शब्द ऐकून वजीराची जी अवस्था झाली, ती ऐकण्यासाठी ही मजेशीर गोष्ट नक्की ऐका!
# 2131 : 'ज्याचं विमानाचं तिकीट कधीच संपत नव्हतं'.
2026/09/19
Send us Fan Mail
एका तिकिटावर १०,००० तासांचा विमान प्रवास आणि ३ कोटी मैलांची रपेट: स्टीव्हन रॉथस्टीनची अजब 'लाईफस्टाईल' ३ कोटी मैल. हे अंतर म्हणजे पृथ्वीपासून चंद्रापर्यंत तब्बल ६० फेऱ्या मारण्यासारखं आहे. एका सामान्य माणसाने हे अवाढव्य अंतर केवळ विमानाने पार केलं, आणि विशेष म्हणजे यासाठी त्याने आयुष्यात फक्त एकदाच पैसे मोजले होते.
# 2130 : ‘स्वतःला नव्याने शोधताना‘ (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. )
2026/09/11
Send us Fan Mail
एका झऱ्याला वाहताना एक दिवस एक मोठं वाळवंट आडवं आलं. ते पार करण्याचा विचार करूनच झरा घाबरला.
तेवढ्यात वाळूचा एक कण त्याला म्हणाला, “तुला हे वाळवंट पार करायचं असेल, तर तुला स्वतःलाच बदलायला लागेल!”
झरा दचकला—“स्वतःला बदलायचं? पण मग मी झरा कसा राहणार?”
पुढे त्याने जे केलं, त्यामुळे तो झरा तर राहिला नाही… पण त्याचं अस्तित्व संपलंही नाही!
असं नेमकं काय घडलं?
=========
# 2129 : ‘माझी खरी किंमत काय?‘ ओशो. (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. )य
2026/09/11
Send us Fan Mail
तुर्कस्तानचा राजा कादिर हसन आणि घोडा विकणारा हबीब यांची ही गोष्ट एका साध्या व्यवहारातून एक विलक्षण सत्य उलगडते.
राजाला घोड्याची किंमत पाचशे ते हजार मोहरा वाटत असताना हबीब मात्र पाच हजार मोहोरांवर ठाम असतो.
आपल्या घोड्याची किंमत सिद्ध करण्यासाठी हबीब जे करतो, ते ऐकून तुम्हालाही क्षणभर आश्चर्य वाटेल.
शेवटी राजालाच आपल्या अंदाजापेक्षा दुप्पट किंमत मोजावी लागते.
ही गोष्ट कदाचित शेवटी तुम्ही स्वतःलाच एक प्रश्न विचारते —“आपली किंमत इतरांनी ठरवावी, की आपल्याला स्वतःची किंमत माहीत असावी?”
Podcast reviews
Read Life of Stories podcast reviews
Podcast sponsorship advertising
Start advertising on Life of Stories relevant audience podcasts
You may also like to advertise on these Podcasts

4.66166304
True Crime with Kendall Rae
Mile Higher Media & Audioboom Studios

4.73397774
The Ancients
History Hit

4.89073308
The Why Files: Operation Podcast
The Why Files: Operation Podcast

51088171
Middle Children
Jessie Jolles and Chris Burns

4.9264922000
Morning Wire
The Daily Wire

4.518762369
American Scandal
Audible

4.689271200
Get Sleepy: Sleep meditation and stories
Slumber Studios

4.79026375
Life is Short with Justin Long
Audible

4.714092347
Bad Friends
Bobby Lee & Andrew Santino

4.7125269
10 to Life
Annie Elise