1568137975
Jyoti Sakpal

Advertise on podcast: Jyoti Sakpal

This podcast has
9 episodes
Language
English
Publisher
Jyoti Sakpal
Explicit
No
Date created
2021/05/18
Latest episode
2026/05/21
Average duration
2 min.
Release period
229 days

Description

Real life poem with short story in Marathi .

Unlock Jyoti Sakpal podcast Email contact info,
Listeners & Audience details

Email contact information

Direct podcast contact details

Listeners

Audience numbers & engagement insights

Audience details

Podcast Insights

Podcast episodes

Check latest episodes from Jyoti Sakpal podcast


अधुऱ्या प्रेमाच्या गोष्टीला तो क्षण पुरेसा होता.
2026/05/21
त्या संध्याकाळी आम्ही  न ठरवताच भेटलो भेटीची ओढ एवढी होती की सर्व वीश्वच विसरलो खळखळून वाहनारा तो समुद्र आज शांत होता मावळत्या सुर्यनेही त्याचा  लाल गुलाबी रंग छेडला होता दगडावर आपटनाऱ्या लाटांचा आवाज कानात  गुनगुनत होता मध्यानंतरानंतर ही मावळता सुर्य जणू आम्हालाच पाहत होता निशब्द त्या क्षणाला डोळ्यांनचा अबोला तुटला होता हात त्याने हातात घेताच ह्यदयाचा ठोका चुकला होता गढद होणाऱ्या अंधाराबरोबर वाराही बेभान झाला होता कवेत त्याने ओढताच मला अंगावरू काटा शहारून आला होता चंद्र  ही जणू हसुन चांदण्यांचा  वर्षाव करत  होता आमच्या अधुऱ्या  प्रेमाच्या गोष्टीला  तो क्षण पुरेसा होता..........
Fathers day
2022/06/18
चाहूल  लागताच  नव्या  पाहुण्याची तो आनंदाने  नाचतो  रोज नवीन नवीन स्वप्नांची सांगड  घालत असतो मुलगा झाला तर अस करेन, मुलगी  झाली तर तसं करेन म्हणतं असतो. ते  नऊ  महिने  त्याच्या  स्वप्नात   त्याचा  चेहरा तो बनवत  असतो आतुरता  त्याला हि आई  एवढीच  असते डोळ्यात  पाणी  त्याच्याही दाटून येत  असते स्पर्श होता त्याचा  तो सर्व दुःख  विसरतो  जगण्यासाठी त्याला आता नवा मार्ग  मिळतो. आई  ऐवढीच  त्यालाही काळजी खूप असते बाप  म्हणून  जबाबदारीची  जाणीवहि असते  वेळ  देता येत  नाही म्हणून  चीड चीड त्याची होते  भविष्याची त्याच्या तरतूद  त्याची  चालू  असते अस्तित्व  त्याचहि  आई  एवढेच  असते बाप  म्हणून  मिरवताना  त्याला खूप आवडते  कठोर  शद्बातहि त्याच्या माया खूप असते.  कधी   बाप तर कधी  मित्र  म्हणून त्याची  ओळख असते .
आयुष्यावर बोलून काही
2022/06/18
आयुष्य  म्हणजे  पाणी , प्रवाह  मिळेल तसं वाहवत  जाणार ,  कधी न थांबणार.  आयुष्य म्हणजे शाळा , शेवट  पर्यन्त  शिकत  राहायच,  प्रत्येक  वळणावर  परीक्षा  देत राहायच. आयुष्य म्हणजे चांगले  तर कधी वाईट  अनुभव  घेते राहायचे,  आणि दुसर्यांनाही  देत राहायचे.  आयुष्यावर बोलू काही प्रवाहाबरोबर  वाहवत जाई  कधी शांत तर कधी खळखळ  आयुष्यावर  बोलू काही अशी शाळा  ज्याला वर्गच  नाही परीक्षा  मात्र रोजच होई  आयुष्यावर  बोलू काही अनुभव  याचा खूप निराळा  कधी चेहऱ्यावर  हसू येई  कधी अश्रूंची फुले होई  आयुष्यावर  बोलू काही.  आयुष्य  हे असं जगावं  मेल्यावरही जिवंत  राहावं  आयुष्याने  पुन्हा म्हणावं   आयुष्यावर  बोलू काही,  आयुष्यावर  बोलू काही.  मला वाटत  आयुष्य असं जगावं कि मेल्यावरही  जिवंत राहाव. मिळालेल्या  सर्व अनुभवातून शिकून  पुढे  जाण्याचा  प्रयत्न  करत राहायचे , कधी कोणाचा  अपमान  होणार नाही याची काळजी घ्यायची,  आपल्याकडे जे आहे त्यातून जमत असेल तर दुसऱ्यांना मदत करायची.  प्रवास  हा खडतर  आहे, आणि तोच कसा सुखकर होईल त्याचा सतत प्रयत्न  करत  राहायचे .
सावराया तूच आहे
2021/10/05
तुला असं काय द्यावं मनात  कायमच  कसं राहावं तुझ्या दिसण्याने मी फुलावं तुझ्या नसण्याने मी मावळावं तूला मी म्हणावं माझ्या चंद्र  पाखरा रात्रीने ही सांगावं नाही कुणी तुझ्या सारखा हृदयाच्या त्या कुपीत तुला असे लपवावे जसे  कस्तुरी मृगाने  कस्तुरीला जपावे तू लांब जरी  माझ्या तरी  मी तुझीच  आहे मी एकटीच तरीही वाटतं सवराया तूच आहे.
सांगावं तर लागेल ना
2021/10/04
उशीरा  का होईना  सांगाव  तर लागेल ना  रत्न  पारखी  त्या डोळ्यांना  बोलावं  तर  लागेल  ना  रिमझीम  पडणाऱ्या  सरींना अंगावर  हळुवार झेलताना मनातल्या  तुझ्या  वादळाना तूला  थांबवाव तर  लागेल  ना  डोळ्यांना  समजलेल्या  भावनांना  शेवटी  शब्दात  मांडाव  तर  लागेल  ना .
कणभर आयुष्यात
2021/10/03
थेंब  थेंब  साचुन  डबके  भरत  होते  डोळ्यातल्या पाण्याचेही  असेच  काहीसे  असते शब्द  शब्द  लागून  मन भरत असते अश्रू बनून  मग  ते डोळ्यातून वाहत  असते हसवणारे प्रवासात हसवून  जात असतात जगण्यासाठी  वाटतं तेच  क्षण  पुरेसे असतात कणभर  आयुष्यात मनभर  अपेक्षा असतात जे प्रवासात एकटं सोडून गेले ते आपले कधीच नसतात
एक लाट अशी
2021/05/18
बेधुंद मनाची लहर , लहरींच्या होती लाटा लाटा या झेलतांना  दुःखांना फुटली फाटा दुःखाच्या या वळणावरती मी नेहमीच एकटी आहे , कधी स्वतःला धडपडताना बघत आहे तर कधी स्वतःच स्वतःला सावरून घेत आहे, अनुभवाच्या आलेखाने एक गोष्ट शिकवली भूक लागल्यावर पाण्याने मात्र भूक वीजवली. आपले  म्हणावे  असे  कोणीच  या  जगात  नसते ,   लहरींच्या  या  लाटेवरती  फक्त फसवे  जग  वसते .
साथ तुझी
2021/05/18
तुझी  साथ  मिळावी  म्हणून  आयुष्य वेचत  राहिले  कधी रुसले तर कधी रडले  कधी हसले  तरी कधी ओरडले पण तुझ्या  पर्यंत  मी  कधीच  नाही पोचले  रुसले  तर बोलास हट्टी  आहेस रडले तर बोलास  नाटकी  आहेस हसले  तर बोलास तुला काळजी नाही ओरडले  तरी बोलास तुला  किमत नाही पण कधीच नाही बोलास त्रास नको करून घेऊस साथ  माझी आहे मी वाट  बघत  राहिली पण तु बोला नाहीस , मी मात्र  त्या वळणावर  तशीच  उभी  आहे. हेवा वाटतो  मला त्या गोडगुलाबी  नात्याचा हसणाऱ्या  बागडणाऱ्या  त्या जोडप्यांचा  विचारते  मी देवाला काय  माझं चुकल  जे मनापासून  मागितलं  तेच हिरावून  घेतल
Jyoti Sakpal (Trailer)
2021/05/18

Podcast reviews

Read Jyoti Sakpal podcast reviews


0 out of 5
0 reviews

Podcast sponsorship advertising

Start advertising on Jyoti Sakpal relevant audience podcasts


What do you want to promote?