Sports कट्टा

Advertise on podcast: Sports कट्टा

Rating
5
from
2 reviews
This podcast has
376 episodes
Language
Explicit
No
Date created
2020/08/18
Average duration
25 min.
Release period
4 days

Description

'Sports कट्टा' - ज्याचे संस्थापक क्रीडापत्रकार गौरव जोशी व अमोल कऱ्हाडकर आहेत - हे मराठी-भाषिक क्रिकेटप्रेमींसाठी पर्वणी घेऊन आलेले चॅनल आहे. सामन्यांचे विश्लेषण ते क्रिकेटचे अर्थकारण ते लोकप्रिय खेळाडूंच्या मुलाखती हे सर्व मराठीमध्ये घेऊन येत आहोत. मराठी क्रिकेटप्रेमींसाठी 'क्रिकेटची तुळशीबाग' अथवा 'रानडे रोड' म्हणून नावारूपाला येण्याचा आमचा संकल्प आहे. "Coffee, Cricket Aani Barach Kaahi" - set up by sports journalists Gaurav Joshi and Amol Karhadkar - hopes to cater to a Marathi-speaking cricket lover. From analysing matches to business of sport to interviews with famous Marathi cricketers, it hopes to emerge as one-stop destination for a Marathi cricket fanatic.

Podcast episodes

Check latest episodes from Sports कट्टा podcast


Gully Cricket with Vinod Kambli to sports film music ft. Kaushal Inamdar
2024/02/25
Kaushal Inamdar is a renowned music composer as we know him. However, he is an ardent sports fan. He grew up in Dadar near Shivaji Park, so it was obvious that he picked up a bat and ball. But he also played hockey in his school days. Today, he passionately follows tennis as well. An athlete and music share a close bond as athletes often find themselves surrounded by music. In this episode of ‘Sportscha Kida’ with Amol Karhadkar, Kaushal shares the relationship between Sports and Music, the learnings from it as a music composer and a lot more… कौशल इनामदार हे ख्यातनाम संगीतकार आहेतच, परंतु खेळ हा त्यांचा तितकाच जिव्हाळ्याचा विषय आहे. दादरला शिवाजी पार्कजवळ वाढल्याने क्रिकेट अर्थातच त्यांच्या रक्तात आहे, पण शाळेत असताना क्रिकेटबरोबर ते हॉकीदेखील खेळले आहेत आणि आता टेनिसही तितक्याच आत्मीयतेने बघतात. खेळाडू आणि संगीत यांचं एक जवळचं नातं असतं, खेळातून त्यांना आयुष्यात आणि संगीतकाराच्या भूमिकेतून आलेली शिकवण म्हणून काय शिकता आलं, यावर कौशलने दिलखुलास गप्पा मारल्या आहेत अमोल कऱ्हाडकरशी ‘स्पोर्ट्सचा किडा‘ या मालिकेत…
more
How Ravi Shastri helped Mumbai regain Ranji Trophy, ft Sulakshan Kulkarni
2024/02/22
Mumbai won the Ranji Trophy in the 1984-85 season and had to endure a drought of eight seasons to lift the coveted trophy again. In his swansong 1993-94 season, Ravi Shastri guided Mumbai to the Ranji title. The quarter-final between Mumbai and Karnataka is still regarded as a landmark game in the history of Indian domestic cricket. Why is the very next season considered the finest domestic season of Sachin Tendulkar’s career? The same team lifted the Ranji Trophy again in 1996-97. What’s the secret of Mumbai’s success? In this episode of Kattyavarchya Gappa, Sulakshan Kulkarni, who was an integral part of those two title-winning runs, took a trip down memory lane with Amol Karhadkar on the latest offering of My Memorable Ranji Trophy Season. १९८४-८५ ते १९९३-९४ हे आठ हंगाम नऊ वर्ष हा मुंबईच्या रणजी ट्रॉफीच्या इतिहासातला सर्वात दुष्काळ होता. ९३-९४ हंगामात मुंबईने रवी शास्त्रीच्या नेतृत्त्वाखाली खेळताना रणजी ट्रॉफीमध्ये ते 'दादा' संघ का आहेत हे दाखवून दिलं. कर्नाटकविरुद्धचा उपांत्यपूर्व  फेरीचा सामना भारतीय क्रिकेटच्या द्रुष्टीने महत्त्वाचा का मानला जातो? मुंबईच्या यशाचं गमक काय असतं? ९४-९५ हंगामातला सचिन तेंडुलकरचा झंझावात काय होता? तसंच ह्या ९३-९४च्या फळीने ९६-९७ मध्ये पुन्हा कशी विजेतेपदाला गवसणी घातली? रवी शास्त्री, संजय मांजरेकर, सचिन तेंडुलकर हे कर्णधार म्हणून कसे होते? हे सगळं जवळून अनुभवलेले सुलक्षण कुलकर्णी सांगत आहेत त्यांच्या संस्मरणीय रणजी हंगामाच्या आठवणी कट्ट्यावरच्या गप्पांमध्ये अमोल कऱ्हाडकरला…
more
Why Sarfaraz Khan needs to be celebrated
2024/02/21
Finally, Sarfaraz Khan made his India debut and how. He scored scintillating half-centuries in both the innings against England in the third Test. But this opportunity came Sarfaraz’s way after banging scoring runs and tons in all conditions and situations. This was a reward for his hard work. Amol Karhadkar, Deputy Sports Editor, at The Hindu, shares his story. But does every cricketer get his reward with an India cap? The answer is ‘No’. In this episode of Weekly katta, Amol Gokhale and Aditya Joshi take a look at a few of India’s domestic stalwarts who never got the India cap…  सर्फराझ खानला अनेक वर्ष देशांतर्गत क्रिकेटमध्ये आपलं नाणं खणखणीत वाजवल्यावर, निवडसमितीच्या दारावर अविरतपणे ठोठावल्यावर अखेरीस तिसऱ्या भारत वि. इंग्लंड कसोटीत पदार्पणाची संधी मिळाली.त्याने त्या संधीच अक्षरशः सोनं केलं. पण प्रत्येक खेळाडूस अशी संधी मिळते का? तर त्याचं उत्तर 'नाही' असं येतं. ह्या वीकली कट्टयावर आदित्य जोशी आणि अमोल गोखले काही अश्या खेळाडूंचा आढावा घेत आहेत ज्यांच्यासाठी भारतीय संघाची दारं किलकिली झाली किंवा कधी उघडलीच नाहीत...  त्याचबरोबर अमोल कऱ्हाडकर सांगतोय सर्फराझ खानचा देशांतर्गत क्रिकेटमधला प्रवास...
more
Ashwin, Stokes to create history, will Rajkot pitch be a mystery?
2024/02/14
In a first in the Marathi podcast world, Sports Katta and  @LeleSunandan  present the first 'crossover podcast' while previewing the third Test between India and England, to be played at the Niranjan Shah Cricket Stadium in Rajkot. The episode features Sunandan Lele and Amol Karhadkar, Deputy Editor with The Hindu... मराठी पॉडकास्टमध्ये प्रथमच एक क्रॉसओव्हर घडतंय... स्पोर्ट्स कट्टा आणि सुनंदन लेले घेऊन येत आहेत भारत विरुद्ध इंग्लंड तिसऱ्या कसोटीचं सादर करीत आहेत पूर्वावलोकन म्हणजे प्रिव्हू...  राजकोटमधील निरंजन शाह क्रिकेट स्टेडियममध्ये होणाऱ्या ह्या कसोटीत रविचंद्रन अश्विन, बेन स्टोक्स, जेम्स अँडरसन ह्या सारख्या विक्रमांच्या उंबरठ्यावर असलेल्या खेळाडूंची हातोटी लागेल का ते कसोटी क्रिकेटचे दादा खेळाडू आहेत हे पुन्हा सिद्ध होईल. द हिंदूचा डेप्युटी एडिटर अमोल कऱ्हाडकर आणि सुनंदन घेऊन येत आहेत हा विशेष भाग राजकोटमधून...
more
Why IPL stars are reluctant to play Test Cricket?
2024/02/13
India and England are set to resume their five-match Test series after a break of 10 days and one can sense that something is bubbling under the surface. The big question is, are IPL stars reluctant to play Test cricket? Or is it just a matter of prioritizing white-ball cricket? The debate can and will go on. On the other hand, records beckon in the third Test. Sarfraz Khan can make his Test debut. Ben Stokes is set to play his 100th Test match. Ravichandran Ashwin is on the brink of 500 Test wickets and James Anderson is five shy of 700 at the age of 41. Sports Katta’s troika - Aditya Joshi, Amol Gokhale and The Hindu’s Sports Journalist Amol Karhadkar - analyze the recent events in the red-ball arena in this episode of Weekly Katta. भारत आणि इंग्लंड ह्यांच्यातल्या तिसऱ्या कसोटीला राजकोटमध्ये १५ फेब्रुवारीला सुरुवात होणार आहे. पण मधल्या १० दिवसात भारतीय संघात मधल्या फळीतील फलंदाजांची कमतरता बघता सारं काही आलबेल आहे ना? असा प्रश्न चाहत्यांच्या मनात नक्कीच उद्भवला असणार. IPL मधल्या 'मोठ्या' खेळाडूंना कसोटी क्रिकेट आणि पर्यायाने रणजी क्रिकेट खेळणं नकोसं झालंय का? का त्यांच्या करियरच्या द्रुष्टीने त्यांना काय करायचं आहे ह्याची स्पष्टता त्यांना आहे असं म्हणणं संयुक्तिक ठरेल? ही चर्चा येणाऱ्या काळात सुरूच राहील. पण केवळ तिसऱ्या कसोटीचा विचार केला तर काही नामवंत खेळाडू विविध विक्रमांच्या उंबरठ्यावर आहेत. सर्फराझ खानला अखेर पदार्पणाची संधी मिळू शकते, तर इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स शंभरावी कसोटी खेळणार आहे. रविचंद्रन अश्विन ५०० तर जेम्स अँडरसन ७०० कसोटी बळींच्या उंबरठ्यावर आहेत. वीकली कट्टयावर ह्या आणि अश्या अनेक मुद्द्यांवर चर्चा केली आहे अमोल गोखले, आदित्य जोशी आणि द हिंदूंचा क्रीडा पत्रकार अमोल कर्हाडकरने...
more
Another final, another loss for Team India: Takeaways of U-19 World Cup
2024/02/12
The U-19 Cricket World Cup once again highlighted a couple of things. India’s consistent performance to make it to the final for the fifth consecutive time. However, their unbeaten run came to a grinding halt against a familiar foe in the final - Australia. But what are the takeaways of this tournament? Uday Saharan came out with flying colours as a skipper and a batter. Musheer Khan and Sachin Dhas showed why they are so highly regarded. On the flip side, Arshin Kulkarni, who promised so much in the lead-up, had an underwhelming tournament. Precisely the pitfalls one must look out for. It is a collective responsibility of the Indian Cricketing ecosystem that these young boys are groomed well so that they can represent the country at the highest level. Amol Gokhale analyzes the U-19 World Cup from India’s perspective in this episode of Weekly Katta.  १९-वर्षाखालील मुलांच्या विश्वचषकाने काही गोष्टी पुन्हा अधोरेखित केल्या. एक म्हणजे भारताचं स्पर्धेतील सातत्य आणि दुसरी गोष्ट म्हणजे विश्वचषक आणि ऑस्ट्रेलिया ह्यांचं समीकरण. अंतिम सामन्यापर्यंत अपराजित असलेला भारतीय संघ पुन्हा एकदा शेवटच्या पायरीवर ऑस्ट्रेलियासमोर अडखळला. उदय सहरण, मुशीर खान, सचिन धस, सौमी कुमार पांडे, नमन तिवारी अशी नावं ह्या वर्ल्ड कपने भारतीय क्रिकेट चाहत्यांना ओळखीची झाली. असं जरी असलं तरी वास्तवाचं भान राखणं गरजेचं आहे. ह्या कामगिरीने हुरळून न जाता पाय जमिनीवर ठेवून सर्वांनीच - खेळाडू, राज्य संघटना आणि ईतर घटक - ह्या खेळाडूंचा खेळ अजून कसा बहरेल, ह्यातून भावी भारतीय खेळाडू कसे तयार होतील याकडे लक्ष देणं तेवढंच महत्त्वाचं आहे. ह्या १९-वर्षाखालील विश्वचषकाचा लेखा-जोखा घेतला आहे अमोल गोखलेने ह्या वीकली कट्ट्यावर…
more
From quitting Kabaddi to 8th Season of PKL: Shrikant Jadhav 's incredible journey
2024/02/11
Shrikant Jadhav grew up in a small village in Ahmednagar district. A certificate of appreciation at the hands of a chief guest in school on Independence Day was a big deal for him at that time. As his game flourished, he moved to Mumbai to compete in Professional tournaments. The journey hasn't been easy by any stretch of the imagination. Shrikant had to pull out of the first two seasons of the Pro Kabaddi League (PKL) because of injuries. That's when the reality hit him hard. He decided to quit the sport so that he could run the house. As fate would have it, Shrikant found his way back into Kabaddi. Today he's one of the most consistent raiders in the league. Shrikant Jadhav shares his journey on this episode of Kattyavarchya Gappa with Amol Gokhale… श्रीकांत जाधवने कबड्डी खेळायला सुरुवात केली अहमदनगर जिल्ह्यातल्या छोट्या खेड्यातून. स्वांत्र्यदिनाच्या दिवशी प्रमुख पाहुण्यांकडून मिळणारं प्रशस्तिपत्रक हि तेव्हा त्याच्यासाठी खूप मोठी गोष्ट होती. तिथून पुढे त्याचा खेळ जसा बहरला तसं त्याने घर सोडलं, मुंबईत आला आणि व्यावसायिक कबड्डी खेळायला सुरुवात केली. आज श्रीकांत प्रो कबड्डी लीगमध्ये आठवा हंगाम खेळतोय, पण हा प्रवास सोपा नक्कीच नव्हता. प्रो कबड्डीच्या पहिल्या दोन हंगामांवर पाणी सोडावं लागलं कारण स्पर्धा तोंडावर असताना दुखापत झाली. त्यावेळी घरच्या हलाखीच्या परिस्थितीच्या वास्तव्याला सामोरं जाण्यासाठी श्रीकांतने कबड्डी सोडायचा टोकाचा निर्णय घेतला, पोलीस भरतीची परीक्षा देखील दिली. पण त्याच्या नशिबात कबड्डी लिहिली होती आणि तो खेळात परत आला. त्याचा हा प्रवास श्रीकांतने उलगडला आहे कट्ट्यावरच्या गप्पांमध्ये अमोल गोखले बरोबर...
more
Is Ravichandran Ashwin India's greatest ever match-winner?
2024/02/07
India’s premier off-spinner Ravichandran Ashwin is on the cusp of 500 Test wickets with 499 against his name after the second India vs England Test. To mark his imminent landmark achievement, in this episode of Weekly Katta, Aditya Joshi and Amol Karhadkar look at his career, the hurdles he had to cross and where his achievement stands in terms of the rich lineage of Indian spinners. Is he the greatest Indian spinner ever?  भारताचा ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विन ५०० कसोटी बळींच्या उंबरठ्यावर आहे. इंग्लंड विरुद्ध दुसऱ्या कसोटीनंतर त्याचे ४९९ बळी आहेत. त्याच्या ह्या कामगिरी निमित्त आदित्य जोशी आणि अमोल कऱ्हाडकर वीकली कट्ट्यावर आढावा घेत आहेत अश्विनच्या कसोटी कारकिर्दीचा. भारताला लाभलेल्या अनेक उत्तमोत्तम फिरकी गोलंदाजांच्या यादीत अश्विन कुठल्या क्रमांकावर आहे? का तो भारताचा सर्वोत्तम फिरकीपटू आहे?
more
100 mtrs sprint runner to Ultimate Kho-Kho: Ashwin Ganpule’s journey of ‘Never Giving Up!’
2024/02/04
Aditya Ganpule won a gold medal in the 100mtrs sprint in his school days. But he opted to play kho-kho because his brother played the game. Today, he plays for Telugu Yoddhas in the Ultimate Kho-Kho league but the journey wasn’t an easy one. He had to deal with failure multiple times at a young age but he kept going without giving up. Still 21, Aditya shares his journey to the top in this episode of Kattyavarchya Gappa with Amol Gokhale… आदित्य गणपुले शाळेत असताना १०० मीटर धावण्याच्या शर्यतीत पहिला आला होता. पण तो खो-खो कडे वळला कारण त्याचा मोठा भाऊ अक्षय खो-खो खेळायचा. पण त्याचा खो-खो चा प्रवास सोपा नक्कीच नव्हता. राष्ट्रीय स्तरावरच्या स्पर्धांमध्ये अनेक त्याला संधी मिळाली नाही पण जिद्द न हरता तो प्रयत्न करत राहिला. दिवसातून एक ऐवजी दोन वेळा सराव करून त्याने स्वतःला सिद्ध केलं आणि आणि आज तो २१व्या वर्षी अल्टिमेट खो-खो मध्ये तेलगू योद्धाज् संघाकडून खेळतो. त्याचा हा प्रवास आदित्य गणपुलेने उलगडला आहे कट्ट्यावरच्या गप्पांमध्ये अमोल गोखले बरोबर...   
more
What Rohan Bopann’s Australian Open title means for Indian tennis
2024/01/31
Rohan Bopanna recently became the oldest tennis player to achieve the World No. 1 ranking in men’s doubles. He also clinched his first men’s doubles title at the Australian Open to add the cherry to the top. Bopanna’s achievements become even more special when you realise that he is 43 years old or in his own words, he is on Level 43. Amol Gokhale, Gaurav Rao and Ninad Indapurkar put into perspective what Bopanna’s feat means to Indian tennis in this episode of Weekly Katta…  भारताचा टेनिसपटू रोहन बोपण्णा पुरुष दुहेरीच्या जागतिक क्रमवारीत अव्वल ठरणारा सर्वाधिक वयाचा खेळाडू ठरला. त्यावर कडी करत त्याने ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेत पुरुष दुहेरीचं अजिंक्यपद देखील पटकावलं. ह्या गोष्टी जास्त विशेष ठरतात कारण रोहनने ह्या दोन्ही गोष्टी वयाच्या ४३व्या वर्षी करुन दाखवल्या आहेत. बोपण्णाच्या शब्दात तो आत्ता लेव्हल ४३ वर आहे. रोहन बोपण्णाच्या ह्या ऐतिहासिक कामगिरीच्या अनुषंगाने अमोल गोखलेने भारतीय टेनिस जगतावर गप्पा मारल्या आहेत डेटा ॲनालिस्ट व टेनिसपटू गौरव राव आणि क्रीडा चाहता निनाद इंदापूरकर ह्यांच्यासोबत वीकली कट्टयावर...
more
Farmlands to Asian Games Gold: Aslam Inamdar’s Kabaddi Journey
2024/01/26
India’s kabaddi star Aslam Inamdar has a touching story. He hails from a poor background and lost his father at a young age. His mother had to work as a domestic help to run the house. The situation compelled Aslam to pick up odd jobs at hotels and farmlands to help his family. However, he never gave his Kabaddi practice a miss. His life changed for the better after he moved to Thane-Mumbai to play in professional kabaddi leagues. His stock rose rapidly after a phenomenal show in the Junior National Meet and every Pro Kabaddi League (PKL) team wanted to sign him. However, he sat out the entire season of PKL because his ‘Guru’ asked him to. But when he returned to the mat with Puneri Paltan, he won everyone’s hearts. Today, Aslam is an Asian Games gold medal winner with the country and shares his journey in this episode of Kattyavarchya Gappa with Amol Gokhale…  अस्लम इनामदार हलाखीच्या परिस्थितीत वाढला. वडील तो लहान असताना वारले, आई चार घरची धुणी-भांडी करून घर चालवायची. त्यामुळे घरी पैसे मागायला लागू नयेत म्हणून त्यानेदेखील लोकांच्या शेतात, हॉटेलमध्ये, पडेल ते काम करत कबड्डी जोपासली. ठाणे-मुंबईत व्यावसायिक कबड्डी खेळायला सुरुवात केल्यावर अस्लमच्या आयुष्याला कलाटणी मिळायला सुरुवात झाली. स्वावलंबन, अपार कष्ट करायची तयारी आणि जिद्दीच्या जोरावर त्याने व्यासायिक कबड्डीत नाव तर कमावलंच, पण 'ज्युनियर नॅशनलमध्ये' चमकदार कामगिरी करत संबंध भारतीय कबड्डी विश्वाचं लक्ष स्वतः कडे वळवलं. केवळ गुरुच्या एका शब्दावर अस्लम 'प्रो कबड्डी लीगचा' एक हंगाम बाहेर पण बसला आणि जेव्हा पुणेरी पलटणकडून मैदानात उतरला तेव्हा मैदान मारलं. आज तो आशियाई खेळात भारताकडून सुवर्णपदक विजेता खेळाडू आहे. त्याचा हा कबड्डीचा प्रवास अस्लम इनामदारने उलगडा आहे कट्ट्यावरच्या गप्पांमध्ये अमोल गोखले सोबत...
more
Desai gaon to India U-19 via Bandra: Prem Devkar's life in a fast lane
2024/01/20
Pacer Prem Devkar began his cricketing journey at 13, playing tennis ball cricket in the backyard with his brothers. Even though he tasted success in that format he always aspired to play ‘leather ball’ cricket. But, in Dombivali, he did not get as many opportunities as he would’ve liked. However, his life shifted into a fast lane on December 13, 2022, when he met coach Sanjay Gaitonde. In the past year, he has made the most of the opportunities that came his way. His impressive bowling performances saw him represent Mumbai at the Vinoo Mankad Trophy, and India U-19s for a quadrangular involving England U-19 and Bangladesh U-19 and made it into India’s U-19 World Cup squad as a reserved bowler. Aditya Joshi charts Prem Devkar’s astonishing journey on Kattyavarchya Gappa… प्रेम देवकर डोंबिवलीजवळच्या देसाई गावचा, जिथे त्याने १३व्या वर्षी टेनिस चेंडूवर घरामागच्या मैदानावर क्रिकेट खेळायला सुरुवात केली. वेगवान गोलंदाज असलेल्या प्रेमला डोंबिवलीत टेनिस चेंडूवर चिक्कार यश मिळालं, पण लेदरच्या चेंडूवर क्रिकेट खेळायची संधी काही मिळाली नाही. १३ डिसेंबर २०२२ ला प्रेमचं आयुष्य बदललं, जेव्हा त्याने प्रशिक्षक संजय गायतोंडेंची भेट घेतली. त्यानंतरच्या एका वर्षात त्याच्या प्रगतीचा वेग थक्क करणारा आहे. गाव ते बांद्रा असा किमान दोन तासाचा एकवेळ प्रवास करत त्याने मिळालेल्या संधीचं सोनं करत विनू मंकड ट्रॉफी, चॅलेंजर, आणि इंडिया U-१९ सगळीकडे आपली छाप पाडली. तो आत्ता दक्षिण आफ्रिकेत १९-वर्षाखालील विश्वचषक खेळायला गेलेल्या संघात राखीव खेळाडू आहे. त्याच्या ह्या प्रवासात त्याच्या कुटुंबाचा आणि आग्री समाजाचा खूप मोठा वाटा आहे. प्रेम देवकरचा हा प्रवास उलगडला आहे आदित्य जोशीने कट्ट्यावरच्या गप्पांमध्ये...
more

Podcast reviews

Read Sports कट्टा podcast reviews


5 out of 5
2 reviews

Podcast sponsorship advertising

Start advertising on Sports कट्टा & sponsor relevant audience podcasts


What do you want to promote?

Ad Format

Campaign Budget

Business Details